सांगली प्रतिनिधी : हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली येथे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व लोककल्याणकारी राज्यकर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मा.मुख्याध्यापक, केदारी रसाळ , उपमुख्याध्यापिका सौ. विनोदिनी मिरजकर , पर्यवेक्षिका श्रीमती वैजयंती सूर्यवंशी या व्यासपीठावर मान्यवरांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. समाजातील वंचित, दुर्बल आणि मागास घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्रमुख वक्त्या सौ. प्रीती बापट यांनी शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता, आरक्षण धोरण आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनीही शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त करून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करून सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षण प्रसारासाठी कार्य करण्याची प्रेरणा घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या