सांगली प्रतिनिधी - सांगली येथील हौसाई वृद्धाश्रमात सुरु असलेली वयोवृद्धांची मोफत सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे असे मत सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी केले.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलिकरण मंत्रालय, व खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज कलावंत खंडोबा फेम अभिनेता देवदत्त नागे, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता संदीप पाठक, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, चित्रपटाचे निर्माते रसिक कदम यांनी भेट देऊन वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत संवाद साधला आणि तांदूळ साखर गहू तेल यासह पन्नास हजार रुपयांचे साहित्य दान केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, संस्थेच्या सचिव रश्मीताई भंडारे, वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.
हौसाई वृद्धाश्रम सांगली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेता देवदत्त नागे म्हणाले, आई वडिलांच्या शिवाय जगात कोणीच नाही, त्यांच्या मुळे श्वास आहे. मुलांनी त्यांची सेवा केली पाहिजे,
विनोदी अभिनेता संदीप पाठक यांनी आपल्या भाषणात वृद्धाश्रमातील महिलांना खळखळून हसवून मायबाप ज्येष्टांना मंत्रमुग्ध केले. हौसाई वृद्धाश्रमात केली जाणारी सेवा कौतुकास्पद असून योग्य ती मदत करणार आहोत.
या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी केले. तर सूत्रसंचालन ऋतुजा कांबळे यांनी केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या सहकार्य आणि आशिर्वादामुळे गरिबांची सेवा कारण्याची संधी मिळाली. सांगली महापालिकेचे नगरसेवक चेतन सूर्यवंशी, प्रशांत सदामते, हरिपूर च्या माजी सरपंच स्नेहलता पवार यांचे सत्कार करण्यात आले.
सिने अभिनेत्री स्मिता पायगुडे-अंजुटे,तथास्तु कल्चरल अकादमीच्या विभाग प्रमुख चैताली तातूगडे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, चित्रपट निर्माते रसिक कदम आदींची भाषणे झाली.
यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी, तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, संचालक नजीर मुजावर,शाबाद म्हेतर, ऍड.शिवाजी कांबळे, धनराज जाधव, प्रशांत सावंत, फर्जाना मुजावर, हरिराम खबाले, रेखा शेंडे, संदीप कोरे, सोनिका कांबळे, राहुल ऐवळे, विकास भंडारे,अमित मुळीक संस्थेचे पदाधिकारी, सभासद कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या