प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना - शिव उद्योग सहकार सेना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे सांगली जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या उत्साहपूर्ण वातावरणात जाहीर करण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष रामेश्वर पाटील वाडेकर यांच्या हस्ते या निवडी जाहीर करण्यात आल्या. सांगली जिल्ह्यात उद्योग, सहकार, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत शिवसैनिकांना संघटित करून संघटना तळागाळात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना - शिव उद्योग सहकार सेना सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या शिफारशीनुसार खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या :
🔸 संग्राम करुणा धनंजय भोसले — कार्याध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 आकाश संगीता वसंत जगदाळे — जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 डॉ. आकाश निर्मला तानाजी कांबळे — ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 उषा कमल जनार्दन गायकवाड — महिलाध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 राहुल रंजना विष्णू खाडे — मिरज तालुकाध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 गणेश मालन भोपाल माळगे — सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 शुभांगी सुशीला सुधीर वेदपाठक — सांगली शहराध्यक्ष, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
🔸 सदाशिव सोनाबाई सिद्धू कांबळे — जिल्हा कार्यकारिणी सदस्य, शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेप्रती निष्ठा व्यक्त करत उद्योग, सहकार आणि व्यवसाय क्षेत्रातील शिवसैनिकांना एकत्रित करून संघटना अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या कार्यामुळे सांगली जिल्ह्यात शिवसेना - शिव उद्योग सहकार सेना अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते पांडुरंग पाटील, प्रशांत पलांडे, चंद्रकांत पाटील जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच विजय पवार, कुलदीप देवकुळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर घोषणांनी आणि जल्लोषाने दुमदुमून गेला.
🚩 “उद्योग, सहकार आणि व्यवसाय क्षेत्रातील शिवसैनिकांचा बुलंद आवाज आता आणखी ताकदीने घुमणार!” 🚩
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या