प्रतिष्ठा न्यूज
वर्धा प्रतिनिधी : स्व. नीरज दादा बूटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित “गौरव गुणवंतांचा” हा भव्य सत्कार सोहळा वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवस्वराज्य बहुद्देशीय संस्था चे संस्थापक दुष्यंत मुकुंदराव ठाकरे तसेच शिव संकल्प बहुउद्देशीय संस्था (वर्धा विभाग मोहीम समिती) चे संस्थापक प्रतीक प्रमोदराव पवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. इंद्रजीत खांडेकर, पोलीस निरीक्षक विलास पाटील व मयूर डफळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमामध्ये वर्धा जिल्ह्यातील दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विविध शाळा व महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संघटनांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, नेतल हेमंतराव येनुरकर ही विद्यार्थिनी दहावी परीक्षेत दिव्यांग प्रवर्गातून राज्यात प्रथम आली असून तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मिसबाह नियाजी फातिमा हिने आष्टी येथून बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला सृष्टी सोनुले, हेमा कोल्हे, श्रावणी पाटील, डिंपल भांगे, अनुराधा भेंडे, तेजस ठाकरे, रोशन घागरे, ऋषिकेश ठाकरे, ओम ठाकरे, श्रेयस गिरमकर, अभिषेक बाळसराफ, ओम गवारले, चित्रांश झाडे, समर्थ कुकडे, हिमांशू घोडे, वैभव कदम आदी सदस्य उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या