तासगाव: रुग्णसेवेला जीवनाचे ध्येय मानून वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ योगदान देणाऱ्या तासगाव तालुक्यातील ज्येष्ठ डॉक्टर दाम्पत्यांचा जीवनगौरव करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.डॉक्टर्स फोरम, तासगाव तालुक्याच्या वतीने धनत्रयोदशीच्या निमित्ताने आयोजित धन्वंतरी पूजन व ज्येष्ठ धन्वंतरी जीवनगौरव सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी सौ. व श्री. डॉ. प्रीतम राऊत, सौ. व श्री. डॉ. संतोष आफळे, सौ. व श्री. डॉ. शिरीष काळे, सौ. व श्री. डॉ. संदीप खारकांडे, सौ. व श्री. डॉ. सुनील पाटील, सौ. व श्री. डॉ. विजय सावंत तसेच श्री. व सौ. डॉ. तेजश्री पोळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन जीवनगौरव करण्यात आला. रुग्णसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या या डॉक्टरांच्या कार्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलाम केला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून तासगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजयाताई पाटील उपस्थित होत्या.तसेच डॉ. संतोष पाटील, डॉ. स्वाती पाटील, डॉ. शहाजी शेळके यांच्यासह तालुक्यातील डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*‘जाणती’ कथेतून हास्याचे फवारे*
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध हास्यकथा-कथनकार जयवंतराव आवटे यांच्या कथाकथनाचे. त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीत ‘जाणती’ ही कथा सादर करून उपस्थितांना खळखळून हसविले. वैद्यकीय क्षेत्रातील ताणतणावाच्या वातावरणात हास्य हेच सर्वोत्तम औषध असल्याचा संदेश त्यांच्या कथाकथनातून देण्यात आला.धनत्रयोदशी व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमामुळे तालुक्यातील डॉक्टरांमध्ये एकोपा, आपुलकी आणि नवचैतन्याची भावना निर्माण झाली.कार्यक्रमाचे संयोजन डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर, डॉ. संजय देवकुळे, डॉ. संतोष ल. पाटील, डॉ. रोहित सूर्यवंशी, डॉ. अनिकेत बोबडे, डॉ. नितीन जाधव, डॉ. विजय माने, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. जहीर नदाफ व डॉ. शब्बीर मुलाणी यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. आभार डॉ. रवींद्र काळे यांनी मानले, तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले. यावेळी डॉक्टर्स फोरम, तासगाव तालुक्याचे सर्व सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या