तासगाव : कै.आर.आर.आबा पाटील यांच्या पुतळ्यासमोरच सुरू असलेले मद्यविक्रीचे दुकान हटविण्याच्या मागणीचा ठराव नगरपालिका सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.तासगाव पालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी स्वाभिमानी विकास आघाडीने बहुमताने दुकान हटविण्याचा ठराव मंजूर केला.विशेष म्हणजे,या विषयावर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विरोधाची भूमिका न घेता तटस्थ राहणे पसंत केले.मात्र,यावेळी नगरसेवक अरुण साळुंखे, नगरसेवक रामभाऊ माळी आणि स्वीकृत नगरसेवक ॲड. तुकाराम कुंभार यांनी कायदेशीर प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे घेऊन पुढील बैठकीत ठराव मांडण्याची भूमिका मांडली.त्यामुळे सभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली.या विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे स्वीकृत नगरसेवक अॅड. तुकाराम कुंभार यांनी पालिका प्रशासनाने सादर केलेल्या टिप्पणीच्या आधारे कायदेशीर बाजू स्पष्ट केली. संबंधित मद्यविक्रीचे दुकान बंद करणे अथवा अन्यत्र स्थलांतरित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याचे प्रशासनाच्या टिप्पणीवरून दिसून येत असल्याने, प्रथम जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे मागवावे आणि त्यानंतर पुढील सभेत हा ठराव मांडावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दुसरीकडे, सत्ताधारी स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सौ. विजया पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद 'पैलवान' नगरसेवक सतीश लिंबळे आणि विशाल शिंदे यांनी नागरिकांच्या मागण्या, परिसरातील गैरसोयी आणि जनभावनांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना प्रसाद पैलवान म्हणाले,विरोधकांनी कायाद्याचा पळावाट काढू नये.आमचा व्यक्तिशः कोणाला विरोध नाही.व्यसन मुक्ती चा संदेश देणाऱ्या नेत्याच्या स्मारकासमोर असणारे दारू विक्रीचे दुकान तासगाव कराना मान्य नाही. त्यामुळे विरोधकांनी आम्हांला पाठींबा द्यावा.पालिकेने ठराव मंजूर केल्यानंतर अंतिम निर्णयासाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविता येईल,अशी भूमिका सत्ताधारी गटाने घेतली,अखेर बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्यात आला.
संबंधित दारू दुकान चे स्थलांतर करण्याची आमची मागणी ही नैतिक आहे.1972 ला घेतलेली परवानगी ही एका गट नंबर वर आहे तर आताची वस्तुस्थिती काय आहे हे विरोधकांनी पाहावे स्व आर आर आबांचा पुतळा नंतर झाला असं म्हणणे हास्यांस्पद आहे,आजची त्यांची भूमिका दारू दुकानाला वाचवनारी आहे.त्यानी उघड भूमिका लोकांसानोर मांडावी
प्रसाद पैलवान उपनगराध्यक्ष
हा विषय सत्ताधारी गटांनी बेकायदेशीरपणे पलिका सभेत आणला आहे दारू दुकान स्थलांतरित करणे किंवा बंद करणे याबाबत नगरपालिकेच्या अधिकाराबाहेर जाऊन नगरपालिका सभेत ठराव करणे बरोबर नाही अशी आमची भूमिका आहे याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागून त्या विरोधात आलेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याची आम्ही सत्ताधारी गटाला विनंती केली आहे मात्र त्यांना या गोष्टीत राजकारण करायचे आहे.
ॲड. तुकाराम कुंभार
स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या