सांगली प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सांगली अंतर्गत व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सांगली आयोजित जिल्हास्तरीय शालेय बेसबाॅल स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलच्या मुलींनी विजेतेपद पटकावले त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सांगली येथील शिवाजी स्टेडियमवर स्पर्धा पार पडल्या. विजयी संघात शिक्षा धनवडे,मेहरोज गिरगावे, वैष्णवी कोळेकर, स्मिता लोखंडे,आरोही म्हारगुडे, स्वराली कदम,जुई धोत्रे, अबोली बिरादार, प्रज्ञा गरंडे,आराध्या मुळके,सना लगीवाले, तेजश्री लाखन, सोनाक्षी गरंडे यांचा समावेश आहे.विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली
यशस्वी खेळाडूंना क्रिडाशिक्षिका रुकसाना मुलाणी, रमेश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी खेळाडूंचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शांतिनाथ कांते उपाध्यक्ष श्री मिलिंद खिलारे,सचिव डॉ मोहन दडगे संचालक प्रा राजेंद्र मेंच, संचालक राजकुमार हेरले, मुख्याध्यापिका सौ. संध्या गोंधळेकर पर्यवेक्षिका सौ. वैशाली कणिरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या