प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची घोषणा होताच तासगावमध्ये समर्थकांनी जल्लोष केला.फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जेसीबीमधून गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.चौरंगी लढतीमुळे निकालाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कौस्तुभ गावडे यांनी आघाडी घेतली होतीपहिल्या पसंतीच्या मतांमधून कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्येही गावडे यांनी आपली आघाडी कायम राखत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.पुण्यात ३० तासांहून अधिक काळ मतमोजणी सुरू होती.गावडे यांच्या विजयाची घोषणा होताच तासगावमधील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात समर्थकांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. द्राक्षभूमी चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन पेढे वाटण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरही फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. *महाविद्यालयासमोर जेसीबीमधून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.*
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील म्हणाले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कौस्तुभ गावडे यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे.आता विधानपरिषदेवर शिक्षक आमदार म्हणून निवड झाल्याने युवा नेतृत्वाला संधी मिळाली आहे.आगामी काळात ते शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्यरत राहतील. त्यांच्या विजयामुळे तासगाव आणि परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि तासगाव परिसरातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील, डॉ.शहाजी पाटील, डॉ. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. जीवन घोडके, डॉ. साईनाथ घोगरे, डॉ. विलास साळुंखे, डॉ. मेघा पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. विशाल पाटील, प्रा. प्रवीण देशमुख, एम. बी. कदम,कुंभार सर, आप्पासो लावंड, प्रदीप सडोलीकर, आशफाख शेख, सुयोग मोहिते, वासू कोळी यांच्यासह समर्थक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या