प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव येथील ग्राहक हक्क चळवळीतील कार्यकर्ते, लेखक मिलींद सुतार यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.ग्राहक संरक्षण क्षेत्रातील गेल्या १५ वर्षांतील त्यांचे योगदान,जनजागृती आणि प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही निवड केली.स्थापत्य अभियंता असलेल्या सुतार यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतमधून दीर्घकाळ काम करत ग्राहक हक्क, माहिती अधिकार आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने जनजागृती केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या