प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र राज्य अँमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धा दि. २७ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत डेरवण (रत्नागिरी) येथे होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सांगली जिल्हा अँमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा ज्युनिअर मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दि. १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, कृपामयी समोर, मिरज रोड, सांगली येथे होणार आहे. स्पर्धेत १४, १६, १८ व २० वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, दि. २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. वेळेत नोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संस्थांनी आपल्या जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून जिल्हा संघासाठी गुणवंत खेळाडू उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन सांगली जिल्हा अँमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष गौतमभाऊ पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
संजय पाटील (सचिव) – ९७६७५९५०५९
डॉ. गणेश सिंहासने – ७३८५३५२६२१
विजयकुमार शिंदे – ९६०४४०३४३४
प्रा. बाळासाहेब माने – ९५४५८८७६२०
हिम्मत शिंदे – ९४२१२१८६१९
सचिन चव्हाण – ९०११५६९०३६
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या