सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सांगली विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली सिव्हील हॉस्पिटल, कुपवाड पूर्व मंडल, उत्तर मंडल, मध्य मंडल, ग्रामीण मंडल आणि पश्चिम मंडल येथे मंडल अध्यक्षांच्या आयोजनात ही शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून समाजाच्या सुख-दुःखात धावून जाणारा आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. रक्तदानासारख्या महान कार्यातून 'सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी' या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच स्टेशन चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी "रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देणारे पवित्र कार्य असून प्रत्येक निरोगी नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदानासाठी पुढे यावे," असे आवाहन करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी व रक्तदात्यांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, पुणे शहर जिल्हा प्रभारी शेखर इनामदार, मनपा सभापती अतुल माने, नगरसेवक विश्वजित पाटील, उदय बेलवलकर, संतोष पाटील, केदार खाडिलकर, सुरेश बंडगर, युवराज गायकवाड, दीपक वायदंडे, नगरसेविका अनिताताई पवार, मनीषाताई कुकडे, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, सविताताई मदने, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, स्मिताताई भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुकडे, शरद देशमुख, विजय साळुंखे, मंडल अध्यक्ष संतोष सरगर, रवींद्र वादवणे, अमित देसाई, कृष्णा राठोड, राहुल नवलाई, जिल्हा चिटणीस रूपालीताई अडसुळे, सुभाष पाटील, प्रवीण पाटील, सागर पाटील, सुरज कोळी, प्रशांत हेरले, राकेश दड्डणावर, शुभम चव्हाण, शुभम देसाई, भूपाल सरगर, राजू पठाण, अनिकेत कलकुटगी, अश्विनी तारळेकर, सुनील भोसले, अजयकुमार देशमुख, प्रसाद वळकुंडे, शशिकांत टेके, रेखाताई इंगळे, गंगुताई नाईक, ललिताताई कांबळे, मकरंद कुलकर्णी, सुस्मिताताई कुलकर्णी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या