प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मुंबईतील जसलोक हॉस्पिटल आणि पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतलेले,जॉईंट रिप्लेसमेंट आणि कॉम्प्लिकेटेड ट्रॉमा सर्जरीचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. इंद्रजीत बागल हे तासगाव येथील लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ सेवेसाठी रुजू झाले आहेत.त्यामुळे हाडांचे गंभीर आजार,मोठ्या शस्त्रक्रिया आणि अपघातग्रस्त रुग्णांवरील अत्याधुनिक उपचार आता तासगावातच उपलब्ध होणार आहेत.डॉ.बागल हे हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया,जॉईंट रिप्लेसमेंट,कॉम्प्लिकेटेड ट्रॉमा, फ्रॅक्चर, तसेच मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि इतर अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचार करणार आहेत.यामुळे उपचारांसाठी इतर मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून ग्रामीण भागातील रुग्णांनाही दर्जेदार आरोग्यसेवा आपल्या शहरात मिळणार आहे.लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच विविध आरोग्य विमा योजनांच्या माध्यमातून पात्र रुग्णांवर मोफत अथवा अल्पदरात उपचार केले जातात. त्यामुळे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होत आहे."सर्वांसाठी आरोग्य" या ध्येयाने कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमध्ये आता पूर्णवेळ अस्थिरोग विभाग सुरू झाल्याने आरोग्यसेवा अधिक सक्षम झाली आहे. आयसीयू व क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. सुधाकर अलमद यांच्या उपस्थितीमुळे अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची क्षमता आणखी वाढली असल्याचे डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांनी सांगितले.
मेडिसिन, नेत्ररोग, अस्थिरोग, युरो सर्जरी, डायलिसिस व नेफ्रोलॉजी, जनरल सर्जरी आदी विभागांद्वारे लाईफकेअर हॉस्पिटलची सेवा अखंड सुरू असून, तासगाव व परिसरातील नागरिकांसाठी हे हॉस्पिटल विश्वासार्ह आरोग्यसेवा केंद्र म्हणून अधिक बळकट झाले आहे.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक प्रताप घाडगे यांनी केले, तर आभार व्यवस्थापिका श्रद्धा खराडे यांनी मानले.यावेळी डॉ. सुधाकर अलमद, डॉ. अनिकेत हजारे, डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. लीना पाटील, संजय तुपे, पुनम पाटील, अमृता घाडगे, मनीषा लुगडे, प्रियांका अमृतसागर, रूपाली पवार, ऋतुजा निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या