प्रतिष्ठा न्युज /अक्षय कोठावळे
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलिस मित्र असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा नष्टे लॉन येथे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे व रजनीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर वर्षाराणी निकम यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
पोलिस प्रशासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता आणि इतर विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांतील पुरस्कारप्राप्त मान्यवर, त्यांचे कुटुंबीय, पोलिस मित्र असोसिएशनचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या