बुधगाव प्रतिनिधी :- पद्मभूषण वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पेटंट , कॉपीराईट व ट्रेडमार्क याबद्दलची माहिती दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे संशोधनातून नवीन पेटंट तयार व्हावेत यासाठी महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन सेल व मायक्रेव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र दि.15-07-2026 रोजी आयोजन करण्यात आले होते. वसंतराव दादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व मायक्रेव्ह कन्सल्टन्सी यांच्यात सन 2019-20 पासून सामंजस्य करार आयआयसी सेल तर्फे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. आयआयसी सेल तर्फे प्रत्येक तिमाहीत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. आतापर्यंत महाविद्यालयाने 89 डिझाइन पेटंट, 25 कॉपीराईट व ऑस्ट्रेलियन सरकारचे पेटंट मिळवले आहेत.
गुजरात येथील मायक्रेव्हचे मॅनेजिंग डायरेक्टर ध्रुव ब्रम्हभट्ट व को फौंडर पूजा मेनन यांनी पेटंट , कॉपीराईट व ट्रेडमार्क या विषयावर मार्गदर्शन केले. आयपीआर बाळगण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी आयपीआर उल्लंघनाच्या काही सुप्रसिद्ध घटनांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध देशांच्या आयपी रँकिंग, तसेच बौद्धिक संपत्तीच्या मालकीचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली. भारताची आंतरराष्ट्रीय आयपीआर स्थिती मजबूत करण्यासाठी, तज्ञांनी आयपीआर सादर करण्याच्या गरजेवर भर दिला आणि विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पना असल्यास पेटंट अर्जांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले. काही विद्यार्थ्यांना कॉपीराइट, कल्पनांची पेटंटक्षमता आणि पेटंटची वैधता याबद्दल जाणून घ्यायचे होते. वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण केले. या सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयपीआर भरण्याच्या प्रक्रियेबद्दल जागरूकता मिळाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. मोहिते यांनी पेटंट व कॉपीराईट चे महत्व स्पष्ट करून प्रोत्साहित करत यापुढेही लागणारे सर्व सहकार्य व मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त पुढाकारासाठी व आयडिया सादर करण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. एस. मोहिते, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. ए. बी. शिंदे ,संशोधन आणि विकास अधिष्ठाता डॉ. एन. एस. बेंबडे, उद्योग संस्था संवाद अधिष्ठाता डॉ. स्नेहा पाटील व डॉ. के.के. पांड्याजी यांनी प्रोत्साहित केले. महाविद्यालयाने हे सत्र सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य आयोजित केले होते.
संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार श्री विशाल दादा पाटील ,संस्थेचे विश्वस्त श्री अमित दादा पाटील व नवनिर्मिती संशोधन मार्गदर्शक डॉ.बी.एस.पाटील यांच्या संकल्पनेतून यांचे मार्गदर्शनाखाली हे सत्र आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे निबंधक श्री. एस. एस. उमराणी, आयपीआर चे समन्वयक प्रा.सौ.अश्विनी भगत आणि उप समन्वयक प्रा. ए.ए.कुसनाळे, या सत्राचे सहकारी प्रा. सौ मेघना खरे यांनी सूत्रसंचालन केले .
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या