तासगाव : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त तासगावातील शिवसूर्य जनसेवा प्रतिष्ठानतर्फे भाविक भक्तांसाठी फराळाचे वाटप करून सेवाभावाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला.श्री विष्णू मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उपक्रमात दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. भक्तांच्या सेवेतून आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न शिवसूर्य जनसेवा प्रतिष्ठानने केला.या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित पवार (गुरुजी), सचिव शुभम पैलवान, सदस्य महेश जाधव तसेच लक्ष्मीनारायण संस्थेचे संचालक एल.के.जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुयोग हडदरे,सदस्य विक्रम कदम, नितीन कुंभार आणि महेश साठे यांनीही उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.या सेवाभावी उपक्रमासाठी श्री विष्णू मंदिर ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.भाविकांना प्रसादरूपाने फराळाचे वाटप करताना भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी प्रतिष्ठानच्या या सेवाकार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाजसेवा आणि भक्तीचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम तासगावात विशेष चर्चेचा विषय ठरला.
भक्तीसोबत समाजसेवेचा संगम;तासगावात शिवसूर्य प्रतिष्ठानकडून भाविकांसाठी फराळ वाटप
By -
जुलै २६, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या