प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत देशी प्रजातींच्या फणस, चिंच, आंबा, जांभूळ, आवळा, रामफळ, लिंबू आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली. तसेच महाविद्यालयातील प्रा. स्वप्नाली उदगावकर व प्रा. सुशील बनसोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला.
यावेळी महाविद्यालयात मागील वर्षी सुमारे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे संगोपनही उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे आजीव सभासद प्रा. डॉ. आशिष पुराणिक, प्रा. एन. के. आपटे, डॉ. शार्दुल ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. महेंद्र बागुल, पर्यवेक्षक चैतन्य कुलकर्णी, श्री अनिल खर्चे, श्री निवृत्ती कोटकर, डॉ. विजय साळुंखे, डॉ. गणेश सिंहासने, श्री रवींद्र कोरे, श्री अविनाश पवार, श्री शेखर शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या