सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच च्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर विश्रामबाग येथील चैतन्य वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
भाजपाच्या ‘सेवा हीच संघटना’ या विचाराला अनुसरून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. अनेक नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेत आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.त्यानंतर विश्रामबाग येथील गव्हर्नमेंट कॉलनीमधील चैतन्य वृद्धाश्रमात क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. समाजातील वंचित आणि ज्येष्ठ घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा सेवा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास आणि लोकहिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे सांगितले. जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेल्या नेतृत्वाचा वाढदिवस सेवा कार्यातून साजरा करणे हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सेवा उपक्रमांमुळे सामाजिक उत्तरदायित्व आणि जनसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे नेत्र तपासणी शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे फळवाटप या माध्यमातून भाजपाच्या सेवाभावी कार्याची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग कोरे, नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, उदय बेलवलकर, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य गणपत साळुंखे, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, शुभम चव्हाण, राजू पठाण, शुभम देसाई, विद्या दानोळे, सुहास कलघुडगी, संतोषकुमार घुणकी, सुनील भोसले, गौस पठाण, श्रीधर जाधव, महेश खराडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या