सांगली प्रतिनिधी : हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली येथे आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मा.मुख्याध्यापक, केदारी रसाळ , उपमुख्याध्यापिका सौ. विनोदिनी मिरजकर , पर्यवेक्षिका श्रीमती वैजयंती सूर्यवंशी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे अंबाबाई तालीम B.P.ED कॉलेजचे माजी प्राचार्य अशोकराव काळे यांनी योगाचे महत्त्व व त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक श्री एकनाथ कौटे, मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
"योग हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली" हा संदेश देत जागतिक योग दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या