सांगली प्रतिनिधी : काठमांडू (नेपाळ) येथे दि. २ ते ४ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या एनएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कु. आलिया नजीरहुसेन मुजावर हिने उत्कृष्ट कामगिरी करत ‘काता’ प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आणि भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली.
तीन देशांच्या सहभागातून पार पडलेल्या या स्पर्धेत आलियाने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. तिच्या या यशामुळे भारतासह सांगली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
या यशामागे ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशनचे प्रशिक्षक श्री. हमजेखान मुजावर, साहिल सर, ओजस सर आणि अंकुर सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलियाने सातत्यपूर्ण सराव करून हे यश मिळविले.
आलियाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या