मिरज दि. ८: गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा दहावीच्या १५ व्या बॅचचा निकाल याही वर्षी १००% लागला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून शाळेच्या उच्च गुणवत्तेची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखली.
मार्च २०२६ मध्ये बोर्डाने घेतलेल्या परीक्षेत
प्रथम क्रमांक - उदगावे नील किशोर 99% , द्वितीय क्रमांक- शिंदे सोहम हनमंत 98. 80%,
तृतीय क्रमांक -धुळूबळू अनिश अभिजीत 97. 60% तसेच गडदावर निधी अजय-95. 60% ,बेडेकर निहारिका श्रीनिवास 95. 40%,पाटील तन्मय प्रकाश 95. 40% त्याचबरोबर 90% च्या पुढचे 12 विद्यार्थी ,डिस्टिंक्शन चे विद्यार्थी 48 आणि फर्स्ट क्लास चे विद्यार्थी 47 असा निकाल हा
विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी संस्थेकडून उपलब्ध करुन दिलेल्या शैक्षणिक सुविधा आणि त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उल्लेखनीय गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी मॅडम तसेच श्री साहेबलाल शरीक मसलत सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक मा. पृथ्वीराज पाटील आणि संस्थेचे विश्वस्त ऍडव्होकेट वीरेंद्रसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिस्त यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. तसेच कॅम्पस कॉर्डिनेटर सतीश पाटील सर ,अधिक्षीका ख्रिस्तीना मार्टिन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या