मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित एमटीडीके (MTDK) शैक्षणिक संकुलात आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते व मॉर्निंग ग्रुप मिरजचे प्रमुख रवी अटक, सी न्यूजचे मिरज प्रतिनिधी अरुण लोंढे तसेच विशेष कार्यकारी अधिकारी सुनील काटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्यास मदत होऊन त्यांच्या बौद्धिक व मानसिक विकासाला चालना मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, स्टीफन काकी, सहकारी शिक्षक, शिबिरार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे व स्वाती खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या