प्रतिष्ठा न्यूज | किरण कुंभार
तासगाव : तासगाव अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी रामशेठ शेटे, तर उपाध्यक्षपदी विनय शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी (दि. ३) संस्थापक कै. रावबहाद्दूर सदाशिव बाबाजी शेटे सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.माजी खासदार संजय (काका) पाटील यांच्याशी चर्चा करून सर्व संचालकांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला.सहाय्यक निबंधक रंजना बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.अध्यक्षपदासाठी रामशेठ शेटे, तर उपाध्यक्षपदासाठी विनय शेटे यांनी सूचक व अनुमोदकांसह नामनिर्देशन अर्ज दाखल केले. निर्धारित वेळेत अन्य कोणताही अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रंजना बारहाते यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक कुमार शेटे,माजी उपाध्यक्ष अनिल कुत्ते तसेच माजी चेअरमन महेश्वर हिंगमिरे यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित अध्यक्ष रामशेठ शेटे व उपाध्यक्ष विनय शेटे यांनी सर्व संचालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.सर्वांच्या सहकार्याने बँकेची प्रगती अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी संचालक अरुण पाटील, उदय वाटकर, धोंडीराम सावंत, राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, उदय डफळापूरकर, अॅड. आशिष अडगळे, सविता पैलवान, उमा हिंगमिरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य अवधूत गडकर, रवींद्र देवधर, प्रदीप पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सगरे, असिस्टंट जनरल मॅनेजर विनायक मेंडगुले, अमित कोकरे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या