प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली– मिरज– कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिक व पाणीपट्टीधारकांना आर्थिक वर्ष २०२६–२०२७ मधील एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांची पाणीपट्टीची बिले वितरित करण्यात आली आहेत. या बिलांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता यावा, यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
महापालिकेच्या संगणक विभागामार्फत ऑनलाइन बिल भरणा प्रणाली अद्याप तांत्रिक कारणांमुळे पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्याने नागरिकांना पाणीपट्टीचा भरणा करताना अडचणी येत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना पाणीपट्टी भरण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने महापालिकेने विलंब शुल्काबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
३१ ऑक्टोबरपर्यंत विलंब शुल्क व दंड व्याजातून सवलत
पाणीपट्टी बिलांचा भरणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क किंवा दंड व्याज आकारले जाणार नाही.
तरी सर्व नागरिक व पाणीपट्टीधारकांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपल्या पाणीपट्टी बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या उपायुक्त (मालमत्ता कर व इतर) अश्विनी पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या