मिरज प्रतिनिधी : सांगली , मिरज आणि कुपवाड महानगरपालिका जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत केंब्रिज स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींनी पहिल्या सामन्यात खाडे स्कूलचा ३-०, दुसऱ्या सामन्यात केंब्रिज स्कूल सीबीएससी ३-२ व अंतिम सामन्यात बेथेस्दा स्कूलचा ४-२ गोल फरकाने विजेतेपद पटकाविले. दिनांक २४ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झालेली आहे. विजयी संघामध्ये ध्वनी शिवगण, चैतन्य हारगे, राजेश्वरी शिंदे, रिद्धी सातपुते, वैदही झरे, धनया कुंभार, लक्ष्मी चौधरी, निधी कदम, अदिती कबाडे, आराध्या टाकवडे, सई पत्की, आराध्या खोबरे, निश्चला साठे, आलिया गवळी, अल्फिया खान, आराध्या ढोबळे इ. खेळाडू खेळले.
या संघाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील, संस्थेचे ट्रस्टी प्रदीप पाटील, संस्थेचे अधीक्षक डॉ. सतीश पाटील मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी समन्वयिका विद्या घुगरे, रुबीना नदाफ, प्रणाली ललित यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तर प्रशिक्षण क्रीडाशिक्षक श्री. दीपक शेलार, अमोल जाधव, जयश्री बिरंगे, सोमनाथ बलगुडे यांचे मिळाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या