सन 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या जुन्या पेन्शन करिता 6 जुलैला आझाद मैदानात भीक मांगो आंदोलन - प्रा. विजय शिरोळकर
By -
जुलै ०३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सन 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणताही पेन्शनचा लाभ मिळालेला नाही, बऱ्याच सेवानिवृत्तांचे कोणत्याही प्रकारचे खाते नव्हते, मग अशा सेवानिवृत्तांनी जगायचं तरी कसं? याकरिता सरकारचे आणि सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त बांधवांचे पेन्शनची "भिक मांगो आंदोलन" निश्चित केल आहे. महाराष्ट्रातील सेवानिवृत्त बांधव आपल्या कुटुंबासहित हातात कटोरा घेऊन मोठ्या संख्येने आझाद मैदान वरती दाखल होणार आहेत.
जुन्या पेन्शन करिता 11 जून 2026 च्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामध्ये 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी. केवळ शंभर टक्के अनुदान नाही म्हणून 1982 ची जुनी पेन्शन नाकारता येणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी याकरिता शिक्षक व पदवीधर आमदारांनी संघटनेची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक घडवून आणावी. सुप्रीम कोर्टामध्ये सकारात्मक शपथपत्र सादर करावे याकरिता विनंती करण्यात येणार आहे.
सर्वच विभागांमध्ये 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली आहे. मात्र केवळ 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन पासून वंचित आहेत. आजपर्यंत बरीच आंदोलने केली पण सरकारने दखल घेतली नाही. काही कर्मचारी सेवानिवृत्त व मृत झाले असून त्यांचे कुटुंबीय अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. सरकार व प्रशासन याबाबतीत अत्यंत उदासीन असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आरोप संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केला आहे.आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम सचिव भास्कर देशमुख सहसचिव सुनील कांबळे, तानाजी शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या