प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असून, कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, यासाठी शनिवार दि. 1 ऑगस्ट व रविवार दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने, 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये SIR दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत करावयाची विविध कार्यवाही जसे Enumeration Form (EF) चे मतदारांना वाटप करणे व त्याबाबत ERONET आज्ञावलीमध्ये अद्यावत करणे, तसेच वाटप केलेले Enumeration Form मतदारांकडून भरून घेणे व स्कॅनिंग करून अपलोड करणे इत्यादी कामकाज हे भारत निवडणूक आयोगाच्या सुधारीत निर्देशांप्रमाणे दि. 30 जून 2026 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामधील मतदारांच्या गणना फॉर्म (EF) चे DIGITIZATION चे आजअखेर कामकाज 75 टक्के पूर्ण झाले असून 25 टक्के कामकाज शिल्लक आहे.
यामध्ये ज्या मतदारांनी अद्याप आपला गणना फॉर्म भरून दिलेला नाही असे मतदार त्याचबरोबर अनुपस्थित मतदार, स्थलांतरीत मतदार, मयत मतदार, दुबार मतदार इतर ठिकाणी MAPPED मतदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मतदारांनी अद्याप आपला गणना फॉर्म भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा केलेला नाही, अशा सर्व मतदारांनी आपले गणना फॉर्म भरून पुढील कार्यवाहीसाठी शनिवार दिनांक 01 ऑगस्ट 2026 व रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी आपण मतदान करत असलेल्या मतदान केंद्रांवर शिबीरामध्ये जमा करावेत. शिबीराचे वेळी सदर यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), BLO पर्यवेक्षक व सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले BOOTH LEVEL AGENT (BLA) हे उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर या शिबीरामध्ये ज्या मतदारांना गणना फॉर्मबाबत काही अडचण असल्यास त्याचेही निराकरण केले जाईल, याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी
या शिबीरात शिल्लक राहिलेल्या मतदारांच्या यादीचे वाचन केले जाणार आहे. तरी या शिबीराचा शिल्लक राहिलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेऊन आपला गणना फॉर्म भरून उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे द्यावा. जेणेकरून दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द होणाऱ्या मतदार यादीमध्ये आपले नाव सामाविष्ठ असेल. याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, विशेष कार्यकारी दंडाधिकारी सांगली रंजना उंबरहांडे, महानगरपालिका उपायुक्त (मिरज) स्मृती पाटील, मिरज गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या