प्रतिष्ठा न्यूज
पलूस, प्रतिनिधी दि. २६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पलूस येथील कार्यालयात सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या पलूस येथील कार्यालयात उत्साहात संपन्न झाली.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि बहुजन हिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
या कार्यक्रमास उल्हास पाटील, अनिल पाटील, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अंकुश राजमाने, विकी तातुगडे, श्रीयोग पाटील आणि विजय परबत उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या