सांगली : सांगली शिक्षण संस्थेच्या डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर, सांगली येथे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक मोहन जोशी यांनी प्रास्ताविक करून योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. गिरीश जोशी यांनी जागतिक योग दिनाचा इतिहास व उद्देश याविषयी माहिती दिली. विजय कुलकर्णी व अमोल कुलकर्णी यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. तसेच पालक चंद्रकांत चंदनशिवे यांनीही विद्यार्थ्यांसमोर काही योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी मुख्याध्यापक मोहन जोशी, सकाळ सत्राचे पर्यवेक्षक महेश सपकाळ, दुपार सत्राच्या पर्यवेक्षिका माधुरी गुजर तसेच सर्व शिक्षक, सेवक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध योगासने करून योगदिनाचा उत्साह वाढविला. विजय कुलकर्णी यांनी प्रत्येक योगासनाचे महत्त्व व त्याचे आरोग्यदायी फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या