सांगली प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून इयत्ता २-३ री,४ थी व ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण नुकतेच अहिल्यानगर जिल्हा,कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुल येथे उत्साहात संपन्न झाले.प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व एस सी आर टी ला उत्कृष्ट सहकार्याबद्दल अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांचा पश्चिम महाराष्ट्र शिक्षक परिषद अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कोपरगाव तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद राऊत राय राज्यस्तरीय मार्गदर्शिका वैशाली पाटील व उज्वला पाटील उपस्थित होत्या.
शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजसाहेब लोंढे, डायट प्राचार्य विकास सलगर, वरिष्ठ अधिव्याख्याता सुरेश माने, अंजली रसाळ, विजयकुमार गदगडे, पल्लवी चिंचोळकर, अधिव्याख्याता प्राची पाटील, स्वाती पेटकर, चंद्रहास हिप्परकर, सुरेखा खोत,रेणुका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबविण्यासाठी नवीन अभ्यासक्रम राज्यस्तर तज्ञ म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली अधिव्याख्याता नम्रता शेजाळ,सुलभा पुजारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील,समीना खलिफा,अजय काळे,अजित वांडरे,संतोष यादव,अमोल माने,आयेशा नदाफ,जुबेर शेख,नजीब पटेल, इर्शाद व्हनवाड,राजू आटपाडकर,अर्चना आणुगडे,आसमा नदाफ,मंदा निकम,रमेश झिटे,रघुनाथ चव्हाण,जहांगीर मुल्ला,तोफिक पटेल,सय्यद शाहेद,मोहम्मद रफीक यांची प्रशिक्षणार्थी राज्य तज्ञ म्हणून निवड करण्यात आली होती.
प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमातील बदल,आनंददायी शिक्षण,कृतिशील अध्यापन,अनुभवाधारित अध्ययन,कौशल्याधारित शिक्षण, मूल्यमापन पद्धतीतील बदल तसेच विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN),कृतीद्वारे शिक्षण,समूहाधारित अध्ययन,डिजिटल साधनांचा वापर, अनुभवाधारित उपक्रम आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यावर भर, विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती,सर्जनशीलता,संवाद कौशल्य आणि समस्या निराकरण क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सांगली तथा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शशिकांत पाटील यांनी सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान विविध कृती,चर्चासत्रे,प्रात्यक्षिके आणि अध्यापन तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ-पुणे बालभारती मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार जून २०२६ पासून इयत्ता २-३ री, ४ थी व ६ वीची सुधारित व नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात येणार आहेत.यामध्ये बालभारती (मराठी), गणित, My English Book, आपल्या सभोवतालचा परिसर भाग एक व दोन आदी प्रमुख विषयांचा पुस्तकांचा समावेश असून इयत्ता चौथीच्या शिवछत्रपतींचे इतिहासात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
शिक्षण संचालक हेमंत वसेकर,सहसंचालिका कमला आवटे, अभ्यासक्रम विकसन प्रमुख राजेंद्र वाकडे,नगर डायट प्राचार्य राजेश बनकर, अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले.
समारोप प्रसंगी संचालक हेमंत वसेकर यांनी राज्यातून प्रशिक्षित 900 शिक्षक हे नवीन अभ्यासक्रमाचे राज्यस्तराचे नेतृत्व करत असून जिल्हास्तर,तालुका स्तर व शेवटच्या शिक्षकापर्यंत नवीन अभ्यासक्रमातील मूलभूत तत्वे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, जागतिक आव्हाने, कौशल्ये, विधायक बदलांशी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला जोडणारे हे प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास,कौशल्याधारित शिक्षणआधुनिक शिक्षण पद्धतीशी सुसंगत अध्यापन,गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने अभ्यासक्रम बदल अत्यंत महत्त्वपूर्ण असून नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील सहभाग वाढून शिक्षण अधिक आनंददायी, सोपे आणि जीवनाशी जोडलेले जाण्यास मदत होणार आहे, असे परिषद जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या