मिरज दि. १६: गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा (CBSE) दहावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला. शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत शाळेची मान उंचावला असून, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
(CBSE) दहावी परीक्षेत सर्व विद्यार्थ्यी उत्तीर्ण होत उल्लेखनीय कामगिरी केली. समृद्धी पाटील ही 98.40% गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेत प्रथम आली, तिला इंग्रजी विषयात 100% गुण मिळाले आहेत. ईश्वरी पाटील हिने संस्कृत मध्ये 100% गुण मिळवून 98% गुणांनी शाळेत दुसरी आली आहे. प्रांजल साळे हा आयटी मध्ये 100% गुण मिळवून 96.80% तृतीय आला. शिवानी पाटील 95.80%, आदिती चवदार 95%, अर्शद मकानदार 95% गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर मनस्वी लकडे व एकता पवार या मराठीमध्ये 100% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच 25 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त, 35 विद्यार्थ्यांना 75% पेक्षा जास्त गुण मिळाले. 15 विद्यार्थ्यांना 60% पेक्षा जास्त गुण मिळाले. या सर्वांना इंग्लिश - रोजलीना बसप्पा, संस्कृत - मनोज लिंबिकाई, मराठी- बसगोंडा कबाडे, IT - श्रेयश जाधव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत उच्च गुणांची नोंद केली. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे नियोजनबद्ध अध्यापन, अनुभवी शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत यांचा मोठा वाटा आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टिन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आम्ही शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. यश हीच आमची प्रेरणा आहे.” तसेच त्यांनी शिक्षकवर्ग आणि पालकांचेही सहकार्याबद्दल आभार मानले. शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयक अश्विनी येळकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त अॅड. विरेंद्रसिंह पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या