प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव साखर कारखाना सुरू राहावा,अशी तासगाव आणि पलूस तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनापासून इच्छा आहे.शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून कारखाना सक्षमपणे चालविण्यासोबतच कारखान्याच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी केले.भारती एनर्जी अँड शुगर कारखान्याचा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ महेंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश लाड, रोहन लाड, राजेंद्र लाड आणि एस. एफ. कदम उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. डॉ. पतंगराव कदम व स्व. भारतीताई लाड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे कर्मचारी योगेश देवकुळे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत होमहवन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी केले.यावेळी बोलताना महेंद्र आप्पा लाड म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या आदर्शानुसार तसेच ज्येष्ठ नेते मोहनशेठ दादा कदम व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज पारदर्शक व योग्य पद्धतीने केले जाईल. कारखाना चालविताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च प्राधान्याने जपले जाईल. आगामी काही दिवसांत सर्वपक्षीय नेते व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गळीत हंगाम शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, कारखान्यात कार्यरत कामगारांना दीपावली सणानिमित्त बोनस जाहीर करण्यात आला. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
यावेळी सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक एस. एफ. कदम, श्रीपती शुगरचे महेश जोशी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास कृष्णा-वेरळा सूतगिरणीचे कार्यकारी संचालक अरुण दिवटे, सुरेश खारगे, पोपट थोरबोले, विक्रम लाड, सचिन जाधव, सुहासदादा पवार, अक्षय कदम, सुवर्ण जाधव, अनिल शिंदे, शरदकाका पाटील, विकास पाटील, वसंत पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, जयकर पाटील, रुपेश शेंडगे, कृष्णदेव रायते, आबासाहेब तांदळे, संतोष पाटील, गणेश पाटील, संपतराव पाटील, बाळासो जाधव यांच्यासह भारती शुगर्स, भारती एनर्जी व श्रीपती शुगर्सचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या