विजयपूर : जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस पक्षाच्या विजयपूर जिल्हा कोअर कमिटीची रचना करण्यात आली असून, आमदार भीमनगौडा पाटील (राजूगौडा) यांची कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जेडीएस कोअर कमिटीचे अध्यक्ष तथा कर्नाटक विधानसभेचे माजी उपसभापती आणि चिंतामणी मतदारसंघाचे माजी आमदार एम. कृष्णारेड्डी यांनी कमिटीतील 13 सदस्यांची यादी जाहीर केली आहे.
कोअर कमिटीच्या सदस्यांची नावे
या कमिटीमध्ये माजी आमदार बी. जी. पाटील हलसंगी, देवानंद चव्हाण, मल्लिकार्जुन यंडिगेरी, बी. डी. पाटील, सोमनगौडा पाटील अप्पुगौडा (मनगुळी), पंचप्पा कलबुर्गी, अप्सरा बेगम चप्परबंद, हनुमंतप्पा तळकेरी, मरियप्पा गिरीणवड्ड, एस. एस. खाद्री इनामदार, शिवनगौडा बिरादार, परशुराम रोणिहाळ आणि जलालसाब एल. मुड्याळ यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे उद्दिष्ट
नव्याने स्थापन करण्यात आलेली ही कोअर कमिटी जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देणे आणि आगामी राजकीय रणनीती आखणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, अशी माहिती जेडीएसचे जिल्हा प्रवक्ते तथा जिल्हा प्रधान सचिव एस. एस. खाद्री इनामदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या