सांगली प्रतिनिधी : गिरीश लोहाना निर्मित किशोरकुमार फॅन क्लब, सांगलीच्यावतीने भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील गाण्यांचा कार्यक्रम, उद्या-रविवार, दिनांक : २८ जून २०२६, सायंकाळी ६ वाजता, रोटरी हॉल, गणेशनगर सांगली येथे आयोजित केलेला आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळात पंधरा संगीतकारांचे महत्वपूर्ण योगदान होते.
त्यामध्ये शंकर जयकिशन, नौशाद, एस. डी. बर्मन, चित्रगुप्त, मदनमोहन, रोशन, रवि, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आंनदजी, हेमंतकुमार, सुधीर फडके
हृदयनाथ मंगेशकर, आणि श्रीनिवास खळे हे होते.
सदर कार्यक्रमाचे दोन भाग केले गेले आहेत. त्यामध्ये पहिल्या भागात शंकर-जयकिशन, नौशाद, चित्रगुप्त, रोशन, ओ. पी. नय्यर, सुधीर फडके आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा सादर करण्यात आला होता.
दुसऱ्या भागात एस. डी. बर्मन, मदनमोहन, रवि, सलील चौधरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आंनदजी, हेमंतकुमार आणि
हृदयनाथ मंगेशकर यांनी
संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील
गाण्यांचा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन किशोरकुमार फॅन क्लबचे संस्थापक गिरीश लोहाना यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या