प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘फ्युचर फॉरवर्ड : करिअर रोडमॅप फॉर कॉमर्स स्टुडंट्स’ या विषयावर करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘सिद्धी व्हील्स’, सांगलीच्या जनरल मॅनेजर श्रीमती सेजल अग्रवाल यांनी प्रमुख वक्त्या म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्रीमती अग्रवाल यांनी चिंतामणराव इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थीनी ते जनरल मॅनेजर पदापर्यंतचा आपला खडतर प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. करिअरच्या वाटचालीत अनेक अडथळे येत असले तरी कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर त्यावर मात करून आपला प्रवास सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधींवरही त्यांनी प्रकाश टाकला.
“मोठी स्वप्ने पाहा, धाडसाने नेतृत्व करा आणि आपल्या यशातून इतरांनाही प्रेरणा द्या,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. कुंभार होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सातत्यपूर्ण कष्ट, जिद्द आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्र बागुल यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यक्रमाच्या विषयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संयोजन तसेच प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. शितल बागुल यांनी करून दिला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी वाणिज्य विभागप्रमुख व संस्थेचे आजीव सभासद प्रा. एन. के. आपटे, अकाउंटन्सी विभागप्रमुख व संस्थेचे आजीव सभासद प्रा. डॉ. आशिष पुराणिक, प्रा. डॉ. शार्दुल ठाकूर, IQAC समन्वयक प्रा. डॉ. विजय साळुंके, अर्थशास्त्र विभागातील प्रा. अनिल खर्चे, प्रा. विनायक महाडिक, प्रा. स्वाती गुळवणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. निवृत्ती कोटकर यांनी केले, तर आभार प्रा. प्रवीण पारधी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या