प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ५ : नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्टच्या वतीने रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला कला विजय पुरस्कार वितरण सोहळा व कलाकार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा ‘युवा कला विजय पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला.
दैवज्ञ भवन येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात नटराज, श्री गणेश आणि धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रंगभूमीचा वैभवशाली वारसा प्रत्येक रंगकर्मीने पुढे चालविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. पुरस्कारप्राप्त कलाकारांनी आपल्या मनोगतात ट्रस्टच्या कार्याविषयी आदर व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.
या वर्षीच्या ‘युवा कला विजय पुरस्काराने’ डॉ. अनुराधा साळुंखे, स्मिता भाटकर, वैष्णवी जाधव, मयुरेश पाटील आणि चेतन सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास एस. एस. जाधव आणि शाहीर बजरंग आंबी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा कडणे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले. सचिव राजेंद्र पोळ यांनी प्रास्ताविक केले, तर सुमित साळुंखे यांनी आभार मानले.
यावेळी सुहास पाटील, रमेश पाटील, प्रशांत जगताप, रोहित पवार, सागर चौगुले, कपिल कडणे, विशाल कुलकर्णी, बाळासाहेब बेलवलकर, चंद्रकांत गायकवाड, पंडितराव बोराडे, जयश्री जाधव, प्रिया गडकरी, अमृता चोडणकर, सुधीर सावंत, संपत कदम, महेश पवार, हेत मकवाना, कृष्णात पाटोळे, लक्ष्मण पाटील, अनिरुद्ध जेरे, सागर घारगे, अथर्व खुरुद आदींसह अनेक कलाकार उपस्थित होते.
रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यामुळे कलाकारांना एकत्र येण्याची, परस्परांशी संवाद साधण्याची आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याची संधी मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या