सातारा प्रतिनिधी : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्यासमोर बसवण्यासाठी सरकारने तयार केलेले अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प ताबडतोब बसवावे अन्यथा 16 डिसेंबर 2026 रोजी शिवप्रताप दिनादिवशी प्रतिकात्मक शिल्प हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत बसवू हे सातारा जिल्हा प्रशासनाला ठणकावून सांगण्यासाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ति आंदोलन, हिंदू एकता आंदोलन, रा स्व संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती आधी हिंदुत्ववादी संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर जोरदार घोषणाबाजी करून ठणकावून सांगितले.
*यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प बनवून मूर्तिकाराच्या स्टुडिओमध्ये गेली अडीच वर्ष तयार आहे. आम्ही सातत्याने मागणी व आंदोलन करत आहे सदरचे शिल्प प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्यासमोर बसवा जेणेकरून पुन्हा अफजल खानाच्या थडग्याचे उडत्तीकरण होणार नाही. राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा पुणे येथील सदाशिवराव पेशवे यांचा पुतळा सरकार बसवते मग अफजल खान वधाचे शिल्प बसवण्यासाठी सरकार विलंब का लावत आहे, सरकार जाणून बुजून टाळाटाळ करत आहे का, अफजल खान थडग्या भोवतीचे अतिक्रमण काढल्यापासून त्या परिसरात शिवभक्तांना त्या परिसरात बंदी केलेली आहे. आता शिवभक्तांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला असून 16 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिनापूर्वी तयार असलेले शिल्प बसवावे व सदरचा परिसर सर्वाना पाहण्यासाठी खुला करावा, नाही तर महाराष्ट्रातील शिवभक्तांना हजारोच्या संख्येने गोळा करून अफजल खानाच्या थडग्यासमोर प्रतिकात्मक शिल्प उभा करणार, जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार राहील.
सातारा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते. येत्या शिवप्रताप दीनापूर्वी अफजल खान वाधाचे शिल्प बसलेच पाहिजे, शिल्प बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, जय भवानी, जय शिवाजी घोषणानी परिसर दनानून सोडला
यावेळी अस्मिता लाड, नगरसेवक सागर पावशे, संतोष शेंडे, अभिजीत बारटक्के, सुहास काशीद, विजय गाडवे, संतोष शिंदे, राजू शेडगे, विनय भिसे, सोमनाथ गोटखिंडे,अनिरुद्ध कुंभार, प्रदीप निकम, बाळासाहेब मोहिते, रवींद्र वादवणे, भूषण गुरव, राम काळे, गजानन माने, गजानन मोरे, प्रेम देसाई, मनोज साळुंखे, शिवाजी पाटील, नितीन बोरावत, आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या