सांगली प्रतिनिधी : महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी संचलित किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, सांगलीच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथे आयोजित कोल्हापूर विभागीय वुशू क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाने आणि जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि सांगली जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे.
या विभागीय स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना *१९ वयोवर्ष, ६०–६५ किलो वजनी गटात कु. राशी पवार हिने आपल्या कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रभावी प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक* मिळवले. तर *१७ वयोवर्ष गटात कु. गनी मुरसल याने उत्कृष्ट लढत देत तृतीय क्रमांकासह कांस्यपदक* पटकावले.
ही पदके केवळ त्यांच्या गळ्यातील पदके नसून, मेहनत, शिस्त, सातत्य, संयम आणि जिद्दीने मिळवलेल्या यशाची अभिमानास्पद पावती आहेत. या दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिले की, ध्येय मोठे असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर यश नक्कीच मिळते.
या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही खेळाडूंचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामागे संस्थेचे चेअरमन शिक्षणमहर्षी प्रा. श्री. आर. एस. चोपडे, शाळेच्या व्यवस्थापिका डॉ. सौ. मानसी सोनलकर आणि मुख्याध्यापिका सौ. दिपाली थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
🌟 *“Commitment to Excellence” या शाळेच्या ध्येयवाक्याला साजेसा पराक्रम करत कु.राशी पवार आणि कु.गनी मुरसल यांनी किड्स पॅराडाईजच्या क्रीडा परंपरेत आणखी एक अभिमानाचा अध्याय जोडला आहे.*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या