प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भारती एनर्जी अँड शुगर प्रा. लि., तुरची (ता. तासगाव) येथे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कारखाना प्रशासनाकडून गाळप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. पतंगरावजी कदम साहेब व स्व. सौ. भारतीताई लाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र (भाऊ) लाड यांच्या हस्ते मिल रोलरचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड, भारती एनर्जीचे चेअरमन व सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेशदादा लाड, पलूस तालुक्याचे युवा नेते व उद्योजक रोहनदादा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच कारखाना गाळपाच्या दृष्टीने पूर्णपणे सज्ज होईल, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी महेंद्र (आप्पा) लाड यांनी तासगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस नोंदी घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस कारखान्याच्या गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास कृष्णा वेरळा सूतगिरणीचे जनरल मॅनेजर अरुण दिवटे, श्रीपती शुगरचे जनरल मॅनेजर एम. पी. जोशी, भारती शुगर्स नागेवाडीचे जनरल मॅनेजर टेक्निकल व्ही. पी. सूर्यवंशी, चीफ इंजिनिअर डी. एम. खोत, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आर. जे. पाटील, असि. इंजिनिअर आर. ए. चव्हाण, पर्यावरण अधिकारी एस. एस. कार्वे, शेती अधिकारी संजय मोहिते, अमरेंद्र निकम, रोहित साळुंखे, सुरक्षा अधिकारी आर. के. फाळके, लेबर ऑफिसर ए. ए. लाड, रणजीत जाधव यांच्यासह माजी जि.प. सदस्य माणिकराव पाटील, संजय पाटील, तुरचीचे सरपंच विकास डावरे, आबासाहेब तांदळे, संतोष पाटील, गणेश पाटील, विलास पाटील, सुनील चव्हाण, अमोल बाबर तसेच तासगाव, डफळापूर व नागेवाडी येथील संबंधित कारखान्यांचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या