प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : नुकत्याच डेरवण येथे झालेल्या ४०व्या राज्य क्रीडा मैदानी स्पर्धेत सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी करीत यश संपादन केले आहे. राज्य स्पर्धेत सहभागी प्राविण्य प्राप्त खेळाडू
1. सई चौगुले 1000मी द्वितीय क्रमांक
हेप्टॅथलॉन द्वितीय क्रमांक
2. सिद्धार्थ गरांडे डेकाथलॉन द्वितीय
लांब उडी चतुर्थ
3. राजवर्धन बर्गे 4X400 रिले द्वितीय
400मी अडथळा चतुर्थ
4. अखिलेश पारसे हेप्टॅथलॉन चतुर्थ
लांब उडी सहावा
5. श्रेयान पाटील पेंटाथलॉन
6. जुबिया मुलाणी 100मी अडथळा
7. साक्षी कोळेकर 600मी
हे सर्व खेळाडू सकस आहार योजनेचे आहेत. यातील सई चौगुले हिची २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवा येथे होणाऱ्या वेस्टझोन राष्ट्रीय स्पर्धेस निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देताना सामाजिक कार्यकर्ते दत्ता उथळे (धनगाव) सोबत अध्यक्ष मकरंद चितळे तर विशेष सहकार्य कार्याध्यक्ष जतीन शहा व खजिनदार प्रमोद शिंदे यांचे मिळाले व तंत्रशुद्ध मार्गदर्शन एस एल पाटील सर, अविनाश सावंत सर व मंदार मोकाशी यांचे मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या