प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :देशसेवेसाठी समर्पित असलेल्या आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित समस्या, अडचणी व तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयात विशेष ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.शिबिरास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,तासगावचे पोलीस निरीक्षक,तालुका कृषी अधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक उपस्थित राहणार आहेत.शिबिरात आजी-माजी सैनिक,त्यांच्या कुटुंबीयांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करून ठोस आणि कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रश्नांना एकाच ठिकाणी मांडण्याची संधी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे.
तासगाव तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक,वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या वारसांनी आपल्या शासकीय कामांशी संबंधित प्रलंबित समस्या व आवश्यक कागदपत्रांसह १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय,तासगाव येथे उपस्थित राहून समाधान शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या