प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : माण-खटाव परिसरातील पावसामुळे येरळा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. मात्र, हे पाणी अडविले जात नसल्याने कृष्णा नदीत मिसळून वाहून जात आहे. भविष्यातील पावसाची अनिश्चितता लक्षात घेता उपलब्ध पाणी जागोजागी अडविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.निमणी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात सध्या सुरू असलेला पाण्याचा प्रवाह अडविल्यास येरळाकाठच्या शेतकऱ्यांसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने निमणी बंधाऱ्यात पाणी अडविण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी निमणीच्या सरपंच सौ. रेखा रविंद्र पाटील यांनी लेखी पत्राद्वारे तासगाव उपविभागाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या