सावळज दि. 9 : अंजनी ता. तासगाव येथील इच्छापूर्ती शेतकरी गटाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी ॲडव्हान्टा कंपनीच्या PAC741 या मका बियाणांची सुमारे 32.5 एकर जमिनिवरती लागवड केलेली असून येथील शेतकरी राज्यस्तरीय मका पीक स्पर्धेची करत असून शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर रात्रीचा दिवस करून मेहनत घेत नामांकित कंपनीचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून मोठ्या विश्वासाने 32.5 एकर क्षेत्रावर या मका पिकाची लागवड केली आहे मात्र सध्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मका पिकाच्या धाटाला तीन, चार, पाच अशी कणसे लागली आहेत सर्वसाधारणपणे 40 ते 70 टक्के शेतात हीच परिस्थिती दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या मका पिकाच्या उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी या मका पिकास कोणतीही लागवड न घालता सुध्दा मुख्य कणसा सोबत 2 ते 3 कणसे येत आहेत
याबाबत हा प्रकार कंपणीचे सांगली जिल्हा सेल्स एक्झिक्युटिव्ह श्री प्रतीक माने यांच्या निदर्शनास आणून दिला आहे त्यामुळे हा प्रकार केवळ एखाद्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिला नसून यामागील नेमके शास्त्रीय कारण शोधावे व त्याची सखोल तपासणी व्हावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत बाधित 21 शेतकऱ्यांच्या मका प्लॉटचे सात बारा व खाते उतारे जोडून कृषी विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे
या निवेदनाच्या माध्यमातून या प्रकाराची शास्त्रीय चौकशी होऊन शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे
या प्रसंगी अंजनी येथील बाधित शेतकरी व इच्छापूर्ती शेतकरी गटाच्या वतीने तासगावचे कृषी अधिकारी अनिल फोंडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सावळज कृषीमंडल अधिकारी आर. जे. पाटील, कृषी सहाय्यक आदित्य काटकर, कृषी सहाय्यक अधिकारी अतुल शिंदे, तसेच इच्छापूर्ती शेतकरी गटाचे दत्तात्रय पाटील व नंदकुमार शिंत्रे आदी शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या