प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : इंडी तालुक्यातील तांबा गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंथनाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून 17.280 लिटर दारूसह दुचाकी जप्त केली.
छाप्यावेळी नोंदणी क्रमांक नसलेल्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या बजाज बॉक्सर दुचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये 17.280 लिटर दारू आढळून आली. दारू व दुचाकी असा एकूण अंदाजे 50,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मसळी बी.के., ता. इंडी येथील अब्दुलसत्तार महम्मदअली गौर (वय 25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
इंडी विभागाचे उत्पादन शुल्क उपनिरीक्षक-2 एस.जी. अंगडी यांनी प्रकरण दाखल केले. कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी सविता मुधोळ, संजीवकुमार हूविनवर, सुभाष अथर्गा, मंजुनाथ बडिगेर व शिवशंकर गोट्याळ यांनी सहभाग घेतला.
याबाबत इंडी विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक राहुल नायक यांनी ही माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या