प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : विजयपूर जिल्हा बिगरशेती पत सहकारी संस्था व सहकार्यांच्या महासंघाची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा के.सी. नगर येथील कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी बिगरशेती पत सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गुरुशांत निडोणी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “बिगरशेती पत सहकारी संस्थांचा आवाज म्हणून महासंघ अत्यंत पारदर्शक व प्रामाणिकपणे कार्य करीत आहे.” जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना उद्देशून त्यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली.
सभेचे उद्घाटन कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी संस्था, बंगळुरूचे संचालक संजय पाटील कनमडी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी, सहकारी संस्थांनी सहकाराच्या ध्येय-उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून तसेच परस्पर सहकार्याच्या भावनेने काम केल्यास सहकार चळवळीला अधिक बळकटी मिळेल आणि सभासदांना उत्तम सेवा देता येईल, असे सांगितले.
कायदे सल्लागार कुंभार यांनी नूतन सहकार कायद्याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन बी. जी. साहूकार यांनी केले. यावेळी सभासद प्रतिनिधींनी विविध सूचना व प्रश्न मांडले. त्यावर अध्यक्ष गुरुशांत निडोणी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
सभेला महासंघाच्या संचालक मंडळाचे सदस्य दिपक शिंत्रे, परशुराम चिंचली, महानगरपालिका सदस्य राजशेखर मग्गीमठ, डॉ सदाशिव जी. पवार, बी. एस. बंडी, एन. डी. करजगी, बी. एस. बालगोंड, सी. व्ही. कडेबागील, बी. एम. इस्लामपूर, आय. एस. तडसद, संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलगूर यांच्यासह जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या