सांगली : श्री साई फाउंडेशन, विश्रामबाग (सांगली) आणि सांगली जिल्हा युथ ज्युदो असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगर वॉर्ड क्र. ८ मधील पाटबंधारे विभागाच्या गेटसमोरील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई पाटील, श्री साई फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव पाटील, सचिव व ज्युदो प्रशिक्षक अतुल जाधव, सभासद उर्मिला राजपूत, आदित्य साबळे, तसेच ज्युदो खेळाडू, पालकवर्ग आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्पमित्र, प्राणीमित्र व पर्यावरण विषयाचे अभ्यासक अमोल जाधव यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि जैवविविधतेचे संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी लहान मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे आवाहन केले.
या वृक्षारोपण उपक्रमाला विद्यानगर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संरक्षणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असून भविष्यातही असे कार्यक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या